उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी लागते ?
उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची (Income Certificate) कॉलेजमध्ये, शाळेत नवीन प्रवेश घेताना, शासकीय नौकाऱ्यांसाठी, शिष्यवृत्ती योजनांचा, विविध शासकीययोजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून आवश्यकता असते.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र काय असते ?
आपल्या मागील वर्षाचा उत्पन्नाचा पुरावा देणारे व तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला होय. उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागील १ वर्षाचे किंवा मागील ३ वर्षांचे अशा दोन फॉरमॅट मधे मिळते. विविध शासकीय कामांसाठी आवश्यकतेनुसार दोन्ही पैकी एका प्रमाणपत्राची मागणी केली जाते.
उदाहरणार्थ महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश घेताना सहसा एका वर्षाचे प्रमाणपत्र लागते. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढताना तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे -
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- सातबारा / भूमिहीन प्रमाणपत्र / पगारपत्रक / उत्पन्नाचा पुरावा
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
उत्पन्नाचे प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी वर दिलेले सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर एक अर्ज करावा लागतो. तेथून तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने तहसील कडे पाठवण्यात येतो. त्या अर्जाची छाननी होण्यास साधारणतः २ ते ५ कामाचे दिवस (Working Day) लागतात.
तहसील कार्यालयातून अर्जाची छाननी होऊन प्रमाणपत्र जारी केल्यानंतर अर्जदारास एक प्रमाणपत्र तयार झाल्याचा मेसेज येतो, याचा अर्थ तुमचे प्रमाणपत्र तयार आहे. तुम्ही ज्या आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज केला आहे तेथून डिजिटली साक्षांकित असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवू शकता.
उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा अर्ज करताना घ्यावयाची काळजी -
- विद्यार्थ्यांनी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा अर्ज आपल्या पालकांच्या (वडिल / आई) नावाने करायचा असतो.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र १ वर्ष / ३ वर्ष यापैकी कोणते हवे आहे याची खात्री करून घ्यावी.
- अर्ज करताना उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी व कोणासाठी हवे आहे याचा उल्लेख करावा.
- प्रमाणपत्राचा अर्ज करत असताना तसेच प्रमाणपत्र घेताना पूर्ण तपासून घ्यावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा -
उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यात जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, किंवा तुम्हाला उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा असेल तर आजच संपर्क करा –
आपले सरकार सेवा केंद्र केकरजवळा -
Share this:
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- More
- Click to print (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Reddit (Opens in new window)
- Click to share on Tumblr (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Skype (Opens in new window)