Skip to content

महाराजस्व अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

महाराजस्व अभियान अंतर्गत आज दि. ०३/०१/२०१९ रोजी ग्रामपंचायत केकरजवळा येथे आपले सरकार सेवा केंद्र केकरजवळा मार्फत विद्यार्थ्यांना विविध महसुली प्रमाणपत्र जसे की, मराठा जात प्रमाणपत्र, डोमसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप मानवत तालुक्याचे नायब तहसीलदार श्री. वाघुंडे सर, मंडळधिकारी श्री. जोशी सर, तलाठी श्री. गोटे सर, सरपंच श्री. उत्तमराव लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

Certificate Distribution by Deputy Tahasildar
Shree. Waghunde Sir

यावेळी मानवत तालुक्याचे नायब तहसीलदार श्री वाघुंडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. साहेबराव लाडाने, श्री. ज्ञानोबा लाडाने तसेच गावातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.